जिंतूर :- जिंतूर येथीलऔंढा रोड वरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण “श्री गुरु नथुराम महाराज केहाळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे करण्यात आले.
. मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार, तंत्र शिक्षण मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 आक्टोबर रोजी हा नामकरण सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याचे उद्घाटन आमदार मा. सौ. मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे ह.भ.प. मधुकर महाराज रिडजकर, प्राचार्य श्री. लोखंडे, डॉ. पंडित दराडे, लक्ष्मणराव बुधवंत, ॲड. विनोद राठोड, दत्तराव कटारे, मुख्याध्यापक के सी घुगे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.आमदार मेघनादीदी साकोरे – बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात श्री गुरु नथुराम महाराज केहाळकर यांचे व्यसनमुक्ती, सदाचार आणि त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील योगदान सर्व समाज घटकासाठी अत्यंत स्मरणीय असेच आहे, असे उद्गार आमदार मेघनादीदी साकोरे – बोर्डीकर यांनी या प्रसंगी काढले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, या संस्थेचे नामकरण ह.भ.प. नथुराम महाराज केहाळकर महाराजांच्या नावावर होणे हा सर्वांसाठी मोठा गौरवाचा क्षण आहे आणि या नामकरणामुळे संस्थेला नवचैतन्य मिळेल,” असे त्यांनी सांगितले.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आणि या नामकरणाने संस्थेच्या यशस्वी वाटचालीत नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेच्या विविध विकास योजना सादर करण्यात आल्या