जिंतूर :- बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत आसोला येथील एका 38 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षण मिळत असल्यामुळे स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.14 ऑक्टोबर सायंकाळी घडली आहे.
मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांनी उभारला असून सरकार पाहिजे तसा मराठ्यांना न्याय देत नसल्यामुळे अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना आज दि.14 ऑक्टोबर 2024 रोजी आसोला येथील संतोष उद्धवराव नेवरे (वय 38 वर्ष)या मराठा बांधवांनी आरक्षण भेटत नसल्यामुळे कंटाळून स्वतःची जीवन यात्रा संपविली आहे.संतोष याने स्वतःच्या शेतात मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडले असून मयताचे लहाने भाऊ परमेश्वर उद्धवराव नेवरे यांनी बामणी पोलिसांना प्रथम खबर दिल्याहून बामणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद घेऊन घटनास्थळाचा त्वरित पंचनामा करून मयत संतोष नेवरे यांचे शवविच्छेदन जिंतूर येथील शासकीय दवाखान्यात केले.
मयत संतोष नेवरे यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई-वडील बहिण भाऊ असा परिवार आहे यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.