जिंतूर :- जिंतूर सेलू विधानसभा निवडणुकीत सुरेश भैया नागरे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असून त्यांना वंचित बहुजन आघाडी कडून तिकीट मिळाले असून जिंतूर सेलू मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस व बी जी पी च्या काळात विकास झाला नाही तालुक्यातील मतदारांनी दोघांनाही संधी दिली यावेळेस मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद द्यावा मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी माहिती सुरेश भैया नागरे यांनी 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली
महाविकास आघाडी कडून मलाच तिकीट मिळणार होते परंतु वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 2014 व 2019 निवडणूक लढवली होती म्हणून जिंतूर मतदार संघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असल्याने व जिंतूर सेलू मतदारसंघातील कार्यकर्ते मतदाराचे ने निवडणूक लढण्यासाठी आग्रह केल्यामुळे व मागील एक वर्षापासून मतदार संघात चांगले कामे केली व माझ्यावर विश्वास ठेवून लोक माझ्या सोबत मोठ्या संख्या आले मला त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे 28 ऑक्टोबर रोजी मोठा शक्ती प्रदर्शन करीत 18 ते 20 हजार लोकांच्या साक्षीने निवडणुकीचा फॉर्म भरणार आहे असेही ते म्हणाले सुरेश भैया निवडणुकी उतरल्याने आता जिंतूर सेलू मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे स्पष्ट झाले आहे