जिंतूर :- तालुक्यातील पालेगाव येथे मंगळवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे जिंतूर तालुक्यातील औंढा जिंतूर रोड रोडवरील पाचेगाव येथे ध्यान केंद्राचा काम सुरू असताना अचानक हवामान मध्ये बदल होऊन आभाळ दाटून आले व दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली यादरम्यान अचानक वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहे सहा पैकी दोघांचे प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून इतर चार लोकांचे उपचार जिंतूर येथील रुग्णालयात सुरू असून घटनेची माहिती मिळताच जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात तुफान गर्दी उसळली घटनेची गंभीरता पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल, जिंतूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धी राज सुकाळे,यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णाची माहिती घेऊन जमलेल्या जमावाला रुग्णालयाच्या बाहेर काढले व तसेच जिंतूर तहसीलदार राजेश सरवदे यांना घटनेची माहिती मिळताच तालुक्यातील पाचलेगाव येथे मंडळ अधिकारी मोहसीन पठाण व तलाठी सुनील इंगे यांना आदेशित करून घटनेचा पंचनामा करण्यात आला