अकबर सिद्दिकी – जिंतूर सेलू मतदार संघात बीजेपी कडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठा शक्ती प्रदर्शन करत दिनांक 28 ऑक्टोबर रोजी येलदरी रोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून हजारोच्या जन समुदायासोबत जिंतूर येथील मुख्य बाजारपेठातून रॅली काढून जिल्हा परिषद मैदान येथे विराट सभेचा आयोजन करण्यात आला होता या सभेत बोलताना आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांनी माजी आमदार विजयराव भांबळे यांनी काही काळ पूर्वी टीका करत म्हणाले होते की या मतदारसंघात बोर्डीकरांनी जुना कारखाना आणून उभा केला आहे या कारखान्यातून फक्त धूरच निघते जर बोर्डीकरांनी कारखाना सुरू केला तर मी राजकारणातून संन्यास घेईन त्या टीकेचा उत्तर देताना मेघना बोर्डीकर म्हणाले की आता तर या मतदारसंघात दोन दोन साखर कारखाने बोर्डीकर परिवाराने उभे केले आहे आता टीका करणाऱ्या नेत्या च्या कुठून दूर निघते? कुठे गेले ते राजकारणातून संन्यास घेणारे? पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मी आमदार झाल्यापासून अडीच वर्ष बीजेपी ची सत्ता नसताना व आल्यावर मी मतदार संघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकास कामे केले आहे या मतदारसंघातील लोकांनी बोर्डीकर परिवारावर खूप प्रेम केले आहे लोकांच्या सुखदुःखात नेहमी बोर्डीकर परिवार सहभागी राहतो माझे बाबांनी मतदारसंघातील कोणत्या ही समाजात भेदभाव केला नाही अनेक लोकांना कायमस्वरूपी नोकरी दिल्या यापुढेही मी जिंतूर सेलू तालुक्यातील लोकांच्या अडीअडचणीसाठी कधीच कमी पडणार नाही असा विश्वास या कार्यक्रमात त्यांनी दिला बीजेपी सरकार च्या माध्यमातून लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सेलू जिंतूर तालुक्यातील एक लाख 12 हजार महिलांना मी लाभ मिळवून दिला आहे तालुक्यातील बारा हजार लोकांना गृह उपयोगी वस्तूंचा वाटप करण्यात आला आहे अशा अनेक योजना आहे याच्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळाला आहे यामुळे निश्चितच जिंतूर सेलू तालुक्यातील मतदार बीजेपी व बोर्डीकर परिवाराच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या अर्ज दाखल करण्याच्या वेळी त्यांचा मुलगा मुलगी व त्यांच्या सासरचे अनेक लोक उपस्थित होते व तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर,मार्केट कमिटीचे सभापती गंगाधर बोर्डीकर, मुन्ना गोरे, डॉक्टर पंडित दराडे, गोपाल रोकडे, सेलू तालुक्यातील सुरेश भुमरे, कुमार घनसावत परभणी बीजेपी जिल्हा अध्यक्ष, व जिंतूर सेलू तालुक्यातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
*सभेत विरोधकाच्या नाव घेऊन कधीच आम्ही राजकारण करत नाही पूर्वी काय केला आता काय करणार आणि पुढे काय करणार,
मा. आ. रामप्रसाद बोर्डीकर
सभेत कधीच आम्ही विरोधकाचा नाव घेऊन राजकारण करत नाही पूर्वी काय केला आता काय करणार आणि पुढे काय करणार म्हणूनच मतदारसंघातील मतदार आमच्या पाठीशी आहे आज जय रॅली निघाली त्यामध्ये रस्त्याने येताना नागरिकांनी मोठ्या परवानावर फुलांचा वर्षाव केला यावेळी मेघना दीदींना लोक म्हणाले की आमची चौथी पिढी आहे बोर्डीकर चा सत्कार सन्मान करीत आहे इतके वर्ष राजकारण करताना आम्ही लोकांची सेवा केली ज्या प्रेमाने लोकांनी आमचा सत्कार सन्मान केला त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत ही निवडणूक बोर्डीकर परिवाराची नसून मतदार संघातील मतदारांची आहे मी सारी जबाबदारी तुमच्यावर सोडतो दुसऱ्यांदा मेघना दीदींना आमदार करा मी उमेदवाराचा बाप म्हणून विनंती करतो असे भावनिक आव्हान माजी आमदार बोर्डीकर यांनी भर सभेत केली मी 25 वर्षाचे राजकारणात मतदार संघाचा विकास करण्यासाठी निधी आणला नाही तो निधी मेघनाने अडीच वर्षात आणून तालुक्याचा विकास केला. येलदरी डॅम समोरचा फुल महाराष्ट्रातील दुसरा आहे यासाठी 60 ते 70 हजाराचा निधी होता तो निधी वाढवून येलदरी परिसरात लोकांना फिरण्यासाठी गार्डन व इतर साहित्य मिळून अडीचशे कोटीचा केला आहे असे अनेक कामे आहे ज्यामुळे तालुक्याचा विकास झाला आहे येणाऱ्या 20 तारखेला मतदान असून कमळाचे चिन्हावर मतदान करून बोर्डीकर परिवारा विजय करणार हे मला खात्री आहे यावेळी असेही ते म्हणाले
व्हिडीओ