जिंतूर :- जिंतूर येथील मालेगाव तांडा व खडक पाटी येथे श्री सेवालाल महाराज व जगदंबा मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला संत श्री बाबू सिंग महाराज महंत पोहरादेवी, श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज मठाधिपती श्री क्षेत्र अमरगड, श्री संत विनोद महाराज टोकवाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विजय जाधव यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेशभैय्या नागरे यांच्या अध्यक्षतेत हा सुवर्ण सोहळा पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मीताई राठोड,अमित राठोड,राजेश चव्हाण, प्रसादराव बुधवंत, बाबूसिंगजी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की यापूर्वी जिंतूर तालुक्यातील राजकारण्यांनी बंजारा समाजाचा वापर फक्त मतदानापुरता केला आहे.परंतु मी कुठल्याही पदावर नसताना आज श्री संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवीचे मंदिर बांधण्यासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही ही त्यांनी दिली.यावेळी सौ.अमृता नागरे,सौ लक्ष्मीताई राठोड ,सौ.मीनाताई राऊत, सौ. अरुणाताई काळे सौ.कमलताई लोखंडे ,नानासाहेब राऊत प्रसादराव बुधवंत,अविनाश काळे, राजेश चव्हाण,अमित राठोड, विनायक आडे, कृष्णा महाराज,प्रेम राठोड, राजेंद्र नागरे, केशवराव बुधवंत, लहू आडे, सचिन राठोड,विष्णू जाधव, उस्मान पठाण, हाशम पठाण,अनंतराव कोरडे,रमेश आडे, राम घुगे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यकामाचे सूत्रसंचालन प्रा. विजय जाधव यांनी केले.