spot_img
HomeBlogएस एम देशमुख यांचे निमंत्रण घेऊन सुरेश नाईकवाडे परभणी जिल्हा दवऱ्यावर

एस एम देशमुख यांचे निमंत्रण घेऊन सुरेश नाईकवाडे परभणी जिल्हा दवऱ्यावर

जिंतूर :- 44 व्या उदगीर येथील राष्ट्रीय अधिवेशन पूर्व तयारीनिमित्त मा.सरचिटणीस यांचा परभणी जिल्हा दौरा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 राष्ट्रीय अधिवेशन उदगीर येथे दिनांक 18 व 19 एप्रिल रोजी आयोजित केले आहे. या अधिवेशनानिमित्त ग्राम व तालुका स्तरावरील पत्रकारांनी उपस्थित राहण्यासाठी मुख्य विश्वस्त मा. एस एम देशमुख यांचा निरोप व निमंत्रण घेऊन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांचा खालील प्रमाणे पहिल्या टप्प्यात परभणी जिल्हा दौरा उद्या दिनांक 31 मार्च 2026 रोजी खालील प्रमाणे तालुका निहाय आयोजित केला आहे. 1) बोरी तालुका पत्रकार संघ ,बोरी.* सकाळी 9:45 वाजता 2 ) जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघ जिंतूर सकाळी 11 वाजता 3) सेलू तालुका मराठी पत्रकार संघ, सेलू दुपारी 1 वाजता 4) मानवत तालुका मराठी पत्रकार संघ मानवत दुपारी 3:00 वाजता 5) पाथरी तालुका मराठी पत्रकार संघ पाथरी सायंकाळी 4:30 वाजता 6) सोनपेठ तालुका मराठी पत्रकार संघ सोनपेठ सायंकाळी 6:00 वाजता. या दौऱ्यात प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार हट्टेकर, जिल्हादयक्ष प्रभू दिपके, कार्यअद्यक्ष लक्ष्मण मानोलीकर हे उपस्थित राहणार आहेत.या दौऱ्यात राज्य अधिवेशन माहिती आणि उपस्थिती बाबत चर्चा करण्यात आली आहे.या तालुका निहाय होणाऱ्या बैठकीस तालुका व नजीकच्या मोठ्या गावातील सर्व पत्रकार वार्ताहर यांनी उपस्थित रहावे असे आवाहन परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments